शुक्रवार, २७ मे, २०१६

आठवणीतील माणसं : विश्वनाथराव वाबळे


                                                              
                          घोडपदेव विभागात अनेक माणसाचं वास्तव्य लाभले कितीतरी आहेत त्यांच्या जुन्या आठवणी असो वा त्यांच्या समाजसेवेची प्रेरणा घेऊन त्यांच्या पुढील पिढीने मार्गक्रमण केले आहे त्यापैकी शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे यांच नांव प्रथमतः आवर्जून घ्यावे लागेल घोडपदेव अति रथी मान्यवर येत तेव्हा शिवनेरकारांचे नांव प्रत्येकांच्या ओठी असे. घोडपदेव विभागाला लाभलेले हे अमुल्य रत्न सर्व क्षेत्रात कार्यरत होते आज त्यांच्या आठवणींना उजाळा देताना एक आठवण आपल्यापुढे प्रकट करावीशी वाटते त्यांनीच सांगितलेली एकेदिवशी वाबळेसाहेब राणिबाग येथे बस पकडण्यासाठी चालले असताना बसथांब्यावर . . .
                                         खुद्द गाडगेमहाराज बसची प्रतिक्षा करीत असल्याचे दिसले लगोलग वाबळेसाहेबांनी त्यांच्या पायावर लोटांगण घातलेn सुटाबुटात असणार्या वाबळेसाहेबांना आपल्या कपड्याचे भान राहिले नाही गाडगेबाबानी पाया पडणार्या वाबळेसाहेबांना असा काठीचा प्रसाद दिला की तो अगदी गोड मानून स्विकारला पण गाडगेबाबांच्या पायाला स्पर्श करण्याचे भाग्य लाभले हा क्षण त्यांनी त्यांच्या ह्रदयात कायम जतन केला . होता 

असे आपले शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे

आठवणीतील माणसं ल गो वाणी मास्तर

आठवणीतील माणसं ल गो वाणी मास्तर


घोडपदेव विभागात अनेक माणसाचं वास्तव्य लाभले कितीतरी आहेत त्यांच्या जुन्या आठवणीना उजाळा देतांना मन भरून येतं. अध्यात्मिक,परमार्थिक क्षेत्रात आणि सामाजिक सेवा तन मन धन अर्पून केली ते आमचे ल गो वाणी मास्तर
श्री कापरेश्वर मंदिर अखंड हरिनाम सप्ताहाची बिजारोपण करणारांपैकी ते एक. या अखंड हरिनाम सप्ताहाची मालिका आजही अव्याहतपणे सुरू आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कीर्तनकार यांचे पदस्पर्श या घोडपदेवला लागले ते मास्तरांमुळे.....
त्या काळात शासन जे पी नियुक्त करीत असत मास्तरबाबांच्या नांवलौकीकांमुळे शासन नेहमीच त्यांच्या नावाची दखल घेत त्यांना जे पी पदाने गौरविण्यात येत असे 
एकदा शरद पवारसाहेबांची रामनगरमध्ये सभा होती पवारसाहेबांचे भाषण सुरू होते मास्तरबाबा त्या दिवशी उशिरा पोहचले गर्दीतून वाट काढीत पुढे चालले असताना पवारसाहेबांचे लक्ष गेले अन त्यांनी या घोडपदेवकरांना अभिमान वाटावा .........
" या वाणीमास्तर......." म्हणाले. सर्वांचे लक्ष मास्तरांकडे वेधले गेले. खुद्द मुख्यमंत्री या म्हटल्यानंतर जे मोठेपण होते ते त्यांच्या अविरतपणे सामाजिक सेवेचा वसा घेतला त्याबद्दल 
असे आमचे वाणी मास्तर.........!

आठवणीतील माणसं : मधु शेट्ये . ....


आठवणीतील माणसं : मधु शेट्ये . . . . . .





जूनी माणसं किती गोड, अन चिवट असत. यावरून मला आज प्रकर्षाने मधु शेट्ये यांची खूप खूप आठवण येऊ लागली. हा माणूसच तसा होता. आम्हाला सोडुन गेले असले तरी प्रत्यक्षात मात्र आजही आमच्या सोबत आहेत असेच वाटते.कुठून तरी आपली कापडी पिशवी हलवित हलवित येईल असं राहून राहून वाटतं. 
पण मधु शेट्ये म्हटले तरी डोळ्यात टचकन अश्रू दाटून येतात. साचणार्या आसवांना वाट मोकळी करावी यासाठी आठवणीतील माणसं कै. मधु शेट्ये यांच्यासाठी दोन शब्द........

मधु शेट्ये म्हणजे वरिष्ठ असले तरी मात्र मी मोठा आणि तु छोटा हा भेदभाव कधीही जोपासला नाही. त्यांच्या हसण्यात आत्मियता, विश्वास आणि दिलासा दिसे त्यामुळे समोरचा माणूस त्यांच्या साध्या हसण्याने तृप्त होत असे. आपण लहाण होऊन समोरच्यांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण करणारा त्यांचा स्वभाव. लहान मुलांबरोबर कॅरम खेळताना कोणी चिटींग केली तर लहान मुलांप्रमाणे भांडण करणारी बाल्यावस्था जोपासली होती. आम्ही भुवईची भाषा यांजकडून शिकलो. गोपनिय मसले ते नेहमी भुवईनी बोलायचे आम्ही तर डोळ्यांनी प्रतिसाद देत होतो. 
वाटले नव्हते इतक्या लवकर ते मार्गस्थ होतील.मृत्युशय्येवर चिवट झुंज देत देत साखरेपेक्षा गोड असणार्या या सुस्वभावी माणसाने एक दिवस कोरड्या ठाक वाटणार्या बटबटीत डोळ्यात उतरून आलेला ओलावा निरोप घेत घेत एका वळणावरती थांबला. अखेरचा तो दिवस ....... मुंबई पोर्ट ट्रस्ट रूग्णालयात मी त्यांच्याजवळ उभा होतो. शेवटचे ते काही क्षण ....... त्यांच्या पायातील भळभळणार्या जखमांना औषधाने धुत्कारले होते. कुटुंब औदासिन सावटाखाली खिन्न होऊन मृत्युंजय मंत्र जपत बाहेर बसले होते. 
इकडे शरीर हळूहळू शिथिल होत चालले होते. अगदी चेतनाहीन..... डोळ्यांत हालचाल मंदावलेली असली तरी माझ्याकडे एकटक पाहत होते . डोळे बोलत नसले तरी भुवया काही तरी सांगत होत्या माझं मलाच गहिवरून आले. कितीतरी सखे सोबती सोडून गेले पण अश्रूनी कधी डोळे पाणावलेले नव्हते पण या निपचित पडलेल्या मधु शेट्येंनी माझ्यातल्या गंगा यमुनांना पूर आणला होता. त्याक्षणी त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याऐवजी मलाच सावरण्याचा प्रयत्न झाला. असे आपले मधु शेट्ये............